पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्ट्रेलियात आग ओकणाऱ्या हिटमॅनचा घरच्या मैदानावर 'फ्लॉप शो'

रोहित शर्मा आणि मिचेल स्टार्क

घरच्या मैदानात नव्या वर्षातील सलामीच्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या पदरी निराशा आली आहे. मागील कॅलेंडर इयरमध्ये टॉपर ठरलेल्या रोहित शर्माला पहिल्या सामन्यात केवळ १० धावांचे योगदान देता आले. कॅलेंडर इयरमधील पहिल्या सामन्यातील रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड भन्नाट असा आहे. त्यामुळे या सामन्यात तो दमदार कामगिरी करेल, अशी आशा होती. मात्र त्याला या सामन्यात धमाका करता आला नाही. मिचेल स्टार्कने रोहितला तंबूचा रस्ता दाखवला,  

INDvsAUS Updates : पहिल्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

यापूर्वी रोहित शर्माने २०१५ च्या कॅलेंडर इयरमध्ये एमसीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १३८ धावांची खेळी केली होती. २०१६ मधील पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात रोहितने १६३ चेंडूत नाबाद १७१ धावांची खेळी केली होती. तर २०१९ मध्ये त्याने सिडनीच्या मैदानात १२९ चेंडूत १३३ धावांची धमाकेदार खेळी केली होती.  ऑस्ट्रेलियाच्या मैदानात कलेंडर इयरमधील पहिल्या सामन्यात  धमाकेदार खेळ करण्याच जबरदस्त रेकॉर्ड त्याला घरच्या मैदानावर दाखवता आला नाही. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात त्याने १५ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने अवघ्या १० धावांचे योगदान दिले. 

धोनीच्या 'कमबॅक' संभ्रमावर गावसकरांचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'

२०१९ मध्ये २८ सामन्यातील २७ डावात रोहित शर्माने ७ शतक आणि ६ अर्धशतकाच्या जोरावर १ हजार ४९० धावा केल्या आहेत. मागील कॅलेंडर इयरमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम रोहितने आपल्या नावे केला होता. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर होता. विराटने २६ सामन्यातील २५ डावात ५ शतके आणि ७ अर्धशतकाच्या मदतीने १ हजार ३७७ धावा केल्या होत्या.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Last three instances when Rohit played the first ODI of a calendar year against Australia Record