पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवृत्तीच्या वक्तव्यावरुन मलिंगाचा यू-टर्न

मलिंगा

श्रीलंकन टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने निवृतीबाबत यू-टर्न घेतला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे मलिंगाने म्हटले होते. मात्र, आणखी दोन वर्षे टी-२० च्या मैदानात खेळू शकतो असे मलिंगाने म्हटले आहे. पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.   

INDvBAN Day-Night Test: 'तिच्या'मुळे अश्विन झाला ट्रोल

मलिंगाने मार्च मध्ये ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले होते. सध्याच्या घडीला श्रीलंकन टी-२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या ३६ वर्षीय मलिंगाने आणखी दोन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय राहण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की,  'टी२० मध्ये केवळ चार षटके टाकावी लागता. त्यामुळेच आणखी काही वर्ष मी संघासाठी योगदान देऊ शकतो, असे वाटते. आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतेसाठी श्रीलंकन संघाचे नेतृत्व करण्यासाठी उत्सुक असल्याचे तो म्हणाला.

स्वप्नातही अंजिक्यला पिंक बॉलच दिसतोय

टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाचे नेतृत्व माझ्याकडेच असेल, असे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. पण ऐनवेळी काहीही होऊ शकते, असेही मलिंगाने म्हटले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये मलिंगाच्या नावे १०० हून अधिक विकेट्स आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.