पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंग्लंडमध्ये कोरोनाने घेतला क्रिकेट क्लबच्या अध्यक्षांचा बळी

 लंकाशायर काउंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉड्किस यांचे निधन

इंग्लंडमधील लंकाशायर काउंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉड्किस यांचे कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ते ७१ वर्षांचे होते. लंकाशायरने आपल्या अधिकृत माहिती देताना मृत्यचे कारण सांगितलेले नाही. पण क्लबच्या प्रवक्त्याने प्रेस असोसिएशनला दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूमुळेच डेव्हिड डेव्हिड हॉड्किस यांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. 

कोविड-१९ : माजी ऑलिम्पिक चॅम्पियन कोरोनाग्रस्तांवरील उपचारात व्यग्र

 क्लबने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, क्लबचे अध्यक्ष डेव्हिड हॉड्किस यांनी दु:खद निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. त्यांना स्वास्थ संदर्भातील काही समस्या होत्या. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्स यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. जगभरात कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकलेल्यांचा आकडा हा सात लाखांपेक्षा अधिक असून ३५ हजारहून अधिक लोकांना कोरोनामुळे जीव गमावला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन, प्रिन्स चार्ल्स यांच्यासह  २३ हजार लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत.