पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेस्सीचा हॅटट्रिकचा पराक्रम, रोनाल्डोच्या विक्रमाशी बरोबरी

मेस्सी आणि रोनाल्डो

स्पॅनिश क्लब एफसी बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीने लाल लिगामध्ये हॅटट्रिकचा पराक्रम करत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. लीगमधील १२ व्या फेरीतील सेल्टा वीगो विरुद्धच्या सामन्यात मेस्सीने सलग तीन गोल डागत संघाला ४-१ असा विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. 

परदेशात फरार झालेला 'मॅच फिक्सर' पोलिसांच्या जाळ्यात

लीगमध्ये मेस्सीची ३४ वी हॅटट्रिक ठरली. यापूर्वी लीगमध्ये सर्वाधिक वेळा हॅटट्रिक करण्याचा विक्रम हा पोर्तुगालच्या  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावे होता. मेस्सीने या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. इटलीच्या युवेंटस संघाच्या ताफ्यात समावेश होण्यापूर्वी रोनाल्डोने रियाल माद्रिदकडून खेळताना लाला लिगामध्ये ३४ वेळा हॅटट्रिक करण्याचा कामगिरी केली होती.

IPL 2020 : लखनऊसह या नव्या शहरातील मैदानात रंगणार सामने

राष्ट्रीय संघाकडून आणि क्लबकडून मिळून सर्वाधिक वेळा हॅटट्रिक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डोच अव्वलस्थानी आहे. रोनाल्डोने आतापर्यंत एकूण ५४ वेळा हॅटट्रिकचा पराक्रम केला आहे. मेस्सीच्या नावे एकूण ५२ वेळा हॅटट्रिकची कामगिरी केली.