पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यूरोपीय लीग : युवा एम्बापेनं मोडला मेस्सीचा विक्रम

किलियान एम्बाप्पे

फ्रान्स क्लब पॅरिस सेंट जर्मेन (एसजी) चा युवा फॉरवर्ड प्लेयर किलियान एम्बाप्पेनं यूरोपीय चॅम्पियन लीगमध्ये मेस्सीचा विक्रम मोडीत काढला. त्याने १५ गोल करत मेस्सीला मागे टाकले आहे. मंगळवारी बेल्जियमच्या  ब्रुग क्लबविरुद्धच्या सामन्यात त्याच्या कामगिरीच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेनने ५-० असा विजय नोंदवला. 

ballon d or 2019 : नेयमार आउट, वान डिक देणार मेस्सी-रोनाल्डोला टक्कर

'गोल डॉट कॉम'च्या वृत्तानुसार, सामन्याच्या दुसऱ्या सत्रात एम्बाप्पे बदली खेळाडूच्या रुपात मैदानात उतरला. संधीचं सोन करत त्याने गोलची हॅटट्ट्रीक डागली. सुरुवातीपासून पीएसजीने सामन्यावर मजबूत पकड मिळवली, सातवें मिनटात स्ट्रायकर माउरो इकार्डीने संघाला आघाडी मिळवून दिली.  

BCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...

सामन्यातील ६१ व्या मिनिटाला एम्बाप्पे वैयक्तिक पहिला गोल डागत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ७९ आणि ८३ व्याम मिनिटाला गोल डाग यूरोपीयन चॅम्पियन लीगमध्ये १५ गोल करण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला. २० वर्ष आणि ३०६ दिवस वयाच्या एम्बाप्पेने यूरोपीय लीगमध्ये १५ गोल डागण्याचा पराक्रम करुन दाखवला. यापूर्वी मेस्सीने २१ वर्ष आणि २८८ दिवस इतके वय असताना १५ गोल डागण्याचा पराक्रम केला होता.