पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिकला ट्रोल करणाऱ्याला क्रिस्टलने फटकारले

अभिनेत्री क्रिस्टल डिसोझा आणि हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याला वर्णभेदावरुन ट्रोल करणाऱ्या युजर्सला अभिनेत्री डिसोझाने फटकारले आहे.  टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसोझाने हार्दिक पांड्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ‘अपने भाई जैसा कोई हार्ड इची नहीं है!’ या कॅप्शनसह ‘ब्रदर फ्रॉम अनादर मदर’ या हॅश टॅगसह तिने हा फोटो शेअर केला होता.  

या फोटोवर समीर नावाच्या एका युजर्सने वर्णभेदी टिपण्णी करत हार्दिक पांड्याची आगामी विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या संघातून निवड कशी झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. ही कमेंट तुच्छ आणि घृणास्पद असल्याची भावना क्रिस्टलने सोशल मीडियाच्या माध्यातून व्यक्त केली आहे.   

याशिवाय अभिनेता अपराशक्ती खुराणासह अनेक चाहत्यांनी या युजर्सला चांगलेच फटकारले आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू असताना आपण पांड्याला प्रोत्साहित करायला हवे. सध्याच्या घडीला पांड्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे. अप्रतिम खेळामुळे आपण सर्वच त्याच्यावर प्रेम करतो, असा उल्लेख अपराशक्ती खुराणाने केला आहे. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी हार्दिक पांड्याला पाठिंबा दर्शवत वर्णभेदी टिपण्णी करणाऱ्या युजर्सला फैलावर घेतले.