पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

KKR च्या त्या 'विक्रमी' खेळाडूला IPL मध्ये खेळता येणार नाही

प्रवीण तांबे

Indian Premier League 2020: आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक वयोवृद्ध खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्याचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सला चांगलाच महागात पडणार आहे. आयपीएलमधील सर्वात वयोवृद्ध ठरलेला फिरकीपटू प्रवीण तांबेला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. हा केकेआरसाठी मोठा धक्काच आहे. २९ मार्चपासून आयपीएलचा महासंग्राम रंगणार आहे. यापूर्वी टी-१० लीगमध्ये खेळल्यामुळे त्याला  आयपीएलच्या मैदानात उतरता येणार नसल्याचे या बीसीसीआच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

कांगारुंच्या शिकारीसाठी या ११ वाघांना मिळू शकते संधी

बीसीसीआच्या नियमानुसार, खेळाडू फक्त आयपीएल खेळू शकतो. इतर देशातील लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळता येत नाही. त्याचे नाव टी-२० लीगमध्ये असणे आणि त्यानंतर आयपीएलमध्ये त्याचा नावाचा समावेश करणे हे नियमबाह्य ठरेल. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले आहे.  

कोहली लय भारी! स्मिथची त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही :गंभीर

आयपीएलच्या लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने प्रवीण तांबेला २० लाख या मूळ किंमतीवर खरेदी केले होते. तांबे यापूर्वी देखील आयपीएलमध्ये खेळला आहे.  २०१३ मध्ये त्याने वयाच्या ४१ व्या वर्षात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.  २०१३ ते २०१६ या कालावधीत त्याने आयपीएलमध्ये ३३ सामने खेळले असून त्याच्या नावे २८ बळींची नोंद आहे. २०१६ नंतर त्याने आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. २०१७ च्या हंगानात त्याला हैदहाबादच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. 

मुंबईच्या या गड्याला खरेदी करुन केकेआरने रचला अनोखा विक्रम

आयपीएलम लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये पुन्हा संधी मिळाल्यानं त्याने मी आजही २० वर्षाच्या युवा खेळाडूची मानसिकता बाळगून असल्याचे म्हटले होते. अनुभव आणि क्षमतेच्या जोरावर संघासाठी चांगली कामगिरी करेन असा विश्वासही तांबेने व्यक्त केला होता. मात्र त्याच्या खेळण्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.