पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019: ठरलं, या टीम खेळणार प्ले ऑफमध्ये

पहिला क्वॉलिफायर सामना हा अव्वल दोन संघात मुंबई आणि चेन्नई यांच्यात ७ मे रोजी होणार आहे.

मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या (IPL) १२ व्या हंगामातील ५६ वा सामना रविवारी रात्री झाला. या सामन्यात मुंबईने कोलकाताचा ९ गड्यांनी पराभव केला. या सामन्याबरोबरच प्ले ऑफच्या टीम आणि त्यांच्यात होणारे सामनेही स्पष्ट झाले आहेत. प्ले ऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि मुंबई इंडियन्स या टीम आधीच पोहोचल्या होत्या. चौथ्या स्थानाबाबत चुरस होती. पण ती टीमही आता ठरली आहे. सनरायजर्स हैदराबाद ही चौथी टीम ठरली आहे. या विजयाबरोबरच गुण तालिकेत मुंबई अव्वल स्थानी आहे. 

पहिला क्वॉलिफायर सामना हा अव्वल दोन संघात मुंबई आणि चेन्नई यांच्यात ७ मे रोजी होणार आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील टीम म्हणचे दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना ८ मे रोजी विशाखापट्टणम येथे होईल. दुसरा क्वॉलिफायर सामना १० मे रोजी पहिल्या क्वॉलिफायरमध्ये पराभूत झालेल्या टीममध्ये होईल. हा सामना ही विशाखापट्टणम येथे होईल. 

मुंबई (नेट रन रेट ०.४२१), चेन्नई (०.१३१) आणि दिल्ली (०.०४) या तिन्ही संघाचे गुण समान (१८) होते. पहिल्या दोन्ही टीम या धावांच्या सरासरीच्या जोरावर पुढे राहिल्या. केकेआरला (नेट रन रेट ०.०२८) प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी केवळ विजयाची गरज होती. परंतु, पराभवामुळे त्यांनी १२ गुणांसह आपल्या अभियानाचा शेवट केला. सनराइजर्स (०.५७७) आणि किंग्ज इलेवन पंजाब (-०.२५१) यांचेही १२-१२ गुण होते. पण हैदराबाद टीम चांगल्या सरासरीमुळे प्ले ऑफमध्ये पोहोचली. 

राजस्थान रॉयल्स (नेट रन रेट -०.४४९) सातव्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (-०.६०७) ११-११ गुणांसह क्रमश: सातव्या आणि आठव्या स्थानी राहिले.