पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'माझ्यासाठी कर्णधार कोहलीनं सर्वस्व पणाला लावले'

विराट कोहली

भारतीय संघाचा स्टायलिश फलंदाज केएल राहुलने मिळालेल्या संधीच सोनं करत कर्णधाराचा विश्वास सार्थ केल्याचे मागील काही सामन्यात पाहायला मिळाले. त्याने वर्षाची सुरुवात धमाकेदार अशीच केल्याचे पाहायला मिळाले. ऋषभ पंत जायबंदी झाल्यानंतर संघाच्या यष्टीरक्षकाची जबाबदारी आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने चोख जबाबदारी पार पाडली. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलने कमालीचा खेळ दाखवला. 

शुक्रिया! पाकची माजी कर्णधार सना मीरचा क्रिकेटला अलविदा

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या मालिकेतील सलामीच्या सामन्यात लोकेश राहुलने 88 धावांची नाबाद खेळी केली होती. लोकेश राहुल हा कर्णधार विराट कोहलीचा लाडला असल्याचे अनेकदा बोलले जाते. खुद्द लोकेश राहुलनेच आता विराट कोहली सोबतच्या मित्रत्वाबद्दल खास गोष्ट सांगितली आहे. नुकतेच सुहेल चंडोक याच्या 'द माइंड बिहाइंड' या कार्यक्रमात लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीसोबतच्या मित्रत्वावर भाष्य केले. या कार्यक्रमात लोकेशला जर अटितटीच्या क्षणी फलंदाजीला जाण्यासाठी तू कोणत्या फलंदाजाच्या साथीनं खेळणं पसंत करशील? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय

यावर लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले. मी विराटसोबत खेळण पसंत करेन कारण तो एक महान खेळाडू आहे, असेही स्पष्टीकरण त्याने दिले.  एवढ्यावरच तो थांबला नाही तर विराट कोहलीनं माझ करिअर वाचवलं असेही त्याने सांगितले. विराटसोबत माझी चांगली मैत्री आहे. त्याने माझ्यासाठी सर्वस्व पणाला लावलं अशा शब्दात लोकेश राहुलने कर्णधार विराट कोहलीबद्दलच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. रोहित शर्मासोबतच्या इन्स्टाग्रामवरील लाईव्ह चॅटमध्ये यापूर्वी भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने लोकेश राहुलचे कौतुक केले होते. रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर लोकेश राहुल सामन्याला कलाटणी देणारा भारतीय संघातील तिसरा महत्त्वपूर्ण खेळाडू असल्याचे भज्ज म्हणाला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:KL Rahul names Virat kohli as he would pick to bat for life says he will give all to save me