भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात विराट कोहलीने अपेक्षित नसणारे काही बदल केल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कोहलीने आपल्या जागी लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकाला बढती दिल्याचे पाहायला मिळाले. धवनच्या साथीने त्याने शतकी भागीदारी करत कर्णधाराचा विश्वास सार्थही ठरवला. चांगल्या सुरुवातीनंतर अर्धशतकापासून तीन धावा दूर असताना तो अँगरच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथकडे झेल देऊन तंबूत परतला. लोकेश राहुलची ४७ धावांची खेळी ही भारताच्या डावातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली.
INDvsAUS Updates : पहिल्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर
भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरल्यानंतर त्याच्या खांद्यावर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी पडली आहे. ही जबाबादारी तो कशी पेलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कंमिन्सच्या एका अफलातून बाऊन्सरवर ऋषभ पंतला २८ धावांवर झेलबाद होऊन माघारी फिरावेल लागले होते. बॅटची कड घेऊन हेल्मेटवर आदळलेल्या चेंडूमुळे पंतला दुखापत झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी आलेला नाही. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही दुखापत त्याची डोकेदुखी देखील वाढवू शकते.
INDvsAUS : सचिन-विराटला मागे टाकत रोहितची विश्वविक्रमाला गवसणी
धवन-लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरल्यानंतर चांगली खेळी करुन टीकाकारांना बॅटने उत्तर देण्याची एक चांगली संधी ऋषभ पंतकडे होती. पण यामध्ये तो पुन्हा अपयशी ठरला. शॉट सिलेक्शनमध्ये गोंधळल्याने त्याला विकेट गमवावी लागली. ऋषभ पंतने ३३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २८ धावांचे योगदान दिले. मोठी खेळी करण्याची आणखी एक संधी त्याने गमावली आहे.