पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

KXIP अश्विन ऐवजी लोकेश राहुल करणार संघाचे नेतृत्व?

लोकेश राहुल-अश्विन

विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या अश्विकडून किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व गमावण्याची वेळ आली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आगामी  २०२० च्या स्पर्धेत त्याच्याकडे कर्णधारपद देण्यास इच्छूक नाही. 

ब्रिटन पंतप्रधानांना मोदींकडून समजली अ‍ॅशेसची विशेष न्यूज

प्रसारमाध्यमात रंगणाऱ्या चर्चेनुसार, पंजाबचा संघ अश्विनच्याजागी बदली खेळाडू घेण्याबाबत इतर फ्रेंचाइजीसोबत चर्चा करत आहे. सध्याच्या घडीला पंजाबच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत लोकेश राहुलचे नाव आघाडीला असल्याचे समजते. 
'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सने अश्विनला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स अष्टपैलू कृष्णप्पा गौथमच्या ऐवजी अश्विनला आपल्या संघात घेण्यास इच्छुक आहे. 

KIA Super League : रॉड्रिग्जचे विक्रमी शतक, लीसह स्मृतीलाही टाकले मागे 

किंग्ज इलेव्हन पंजाबने २०१८ च्या हंगामा आर. अश्विनसाठी तब्बल ७.६ कोटी रुपये मोजले होते. याशिवाय त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते.आयपीएलमधील २८ सामन्यात पंजाबचे नेतृत्व करताना त्याने २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबन २०१८ आणि २०१९ च्या हंगामात अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या स्थानावर राहिले होते.