पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

China Open : श्रीकांतची माघार, सिंधू-सायनाकडून विजयी प्रवाहाची आस

पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने मंगळवार पासून सुरु होणाऱ्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. श्रीकांतच्या अनुपस्थितीत भारताची मदार महिला गटातील दोन ऑलिम्पिक क्वीन अर्थात सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यावर असणार आहे. 
एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत मजल मारलेल्या श्रीकांतची या स्पर्धेत जपानच्या केंटो मोमोटा विरुद्ध लढत होणार होती. मात्र त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.  

शुभमन गिलनं मागे टाकला किंग कोहलीचा विक्रम

त्याच्याशिवाय पुरुष दुहेरीत सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या जोडीने मागील महिन्यात फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. महिला एकेरीत सलामीच्या लढतीत पीव्ही सिंधूसमोर जर्मनीच्या युवोन्नेचे आव्हान असेल. तर आठव्या मानांकित सायना नेहवालचा सामना हा चीनच्या काय यान यान हिच्याशी रंगणार आहे.

'पॉवर प्ले'नंतर क्रिकेटमध्ये 'पॉवर प्लेयर'ची संकल्पना

यांच्याशिवाय बी साई प्रणीत, समीर वर्मा, एचएस प्रणाय, माजी राष्ट्रमंडल चॅम्पियन पारुपल्ली कश्यप पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. तर मिश्र दुहेरीमध्ये प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांच्यावर भारताची मदार असेल.