पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिकलेल्या दाढीवरुन पीटरसननं विराटला केलं ट्रोल

विराट कोहली

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. बहुचर्चित आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली असून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेवरही संकट घोंगावताना दिसत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनची रणनिती आखली आहे. लॉकडाउनच्या काळात क्रिकेटर घरातूनच घरात बसलेल्या आपल्या चाहत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन करत आहेत.  

स्वतःचे केस कापत असल्याचा सचिन तेंडुलकरचा फोटो चर्चेत!

विराट कोहली सोशल मीडियावर चांगलाच आघाडीवर दिसतोय. तो पत्नी आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मासोबत अनेक फोटो शेअर करत आहे. नुकताच विराटने दाढी ट्रिम करण्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. विराटच्या आतापर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओलाही चांगली पसंती मिळाली. दरम्यान केविन पीटरसनने या व्हिडिओमध्ये विराटची दाढी पिकल्याचे (दाढीचे केस पांढरे होणे) निदर्शनास आणून देत त्याला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले.   

Video: आक्रमक कोहली लॉकडाउनमध्ये अनुष्कासमोर दिसला कूल अंदाजात

विराट कोहलीने दाढी ट्रिम करण्याचा विचार करत असल्याचा  व्हिडिओ शेअर केल्यानंतर केविन पीटरसनने प्रतिक्रिया दिली आहे. विराटच्या इन्ट्राग्रमा व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना पीटरसनने लिहिलंय की, मित्रा यामुळे पांढरे झालेल्या केसातूनही मुक्त होशील अस वाटते का? विराट कोहलीने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात कोहलीच्या दाढीचे केस हे पांढरे झाल्याचे दिसून येते. यावरुनच पीटरसनने कोहलीली ट्रोल केलय. यापूर्वी चक्क अनुष्का शर्मा विराट कोहलीची केश रचना करताना पाहायला मिळाले होते. खुद्द अनुष्काने विराट कोहलीचे केस कापत असलेला व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओलाही चांगलीच पसंती मिळाली होती. याशिवाय अनुष्काने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती कोहलीला काय करतोस? चौकार मार ना, चौकार! असे म्हणताना दिसली होती.