पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विजय हजारे चषक: संजू सॅमसनचे विक्रमी द्विशतक

संजू सॅमसन

केरळचा युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने स्थानिक क्रिकेटमध्ये विक्रमी द्विशतक झळकावले आहे. विजय हजारे चषक स्पर्धेत त्याने १२९ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने २१२ धावांची नाबाद खेळी केली.  विजय हजारे चषकातील ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. संजू सॅमसनचे द्विशतक आणि सचिन बेबी (१२७) धावांच्या जोरावर अ गटातील सामन्यात केरळने गोव्या विरुद्ध निर्धारित ५० षटकात ३ बाद ३७७ धावा केल्या.  

टीम इंडियाने महाराजला चांगलेच धुतले!

स्थानिक क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या
संजू सॅसमनने १२५ चेंडूत आपले द्विशतक झळकावले. भारतातील स्थानिक क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारचा विचार केल्यास संजू सॅमसन सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे.  विजय हजारे चषकात यापूर्वी कर्ण कौशलच्या नावे २०२ धावांचा विक्रम होता.  

जागतिक चॅम्पियनशीपः मेरी कोमला कांस्य पदक, तुर्कीच्या खेळाडूकडून पराभव

केएससीए क्रिकेट मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या केरळची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रॉबिन उथप्पा (१०) आणि  विष्णु विनोद (७) धावा करुन परतल्यानंतर  संजू सॅमसन आणि सचिन बेबी यांनी संघाचा डावाला भक्कम स्थितीत नेले.  

द्विशतक झळकावणारे भारतीय फलंदाज 
रोहित शर्मा (आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ३ द्विशतक  )
सचिन तेंडुलकर/विरेंदर सेहवाग (आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी एक-एक द्विशतक)
शिखर धवन (२४८, भारत-अ v दक्षि आफ्रिका-अ, ऑगस्ट २०१३)
कर्ण कौशल (२०२, उत्तराखंड, २०१८/१९, विजय हजारे चषक)
संजू सॅमसन (२१२*  केरळ)