पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०: J&K बोर्डाने असा केला रणजी संघातील खेळाडूंना संपर्क

जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय

जम्मू काश्मीरमधील जीजीएम सायन्स कॉलेज हॉस्टेलच्या मैदानात यजमान जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांच्यात रणजी चषकातील उप उपांत्य सामना रंगला आहे. ईलीट ग्रुप सीमध्ये ९ पैकी ६ सामन्यातील विजयासह जम्मू काश्मीरचा संघाने ३९ अंक मिळवले असून ते पहिल्या स्थानावर आहेत. तर टीम ईलीट ग्रुप एक आणि बीमधील ८ पैकी चार सामन्यातील विजयासह कर्नाटक ३१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जम्मू काश्मीर संघाचे मेंटर इरफान पठाण यांनी संघ उपांत्य सामन्यात पोहचेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

T20 WC 2020: डान्समुळे पाक महिला क्रिकेटर ट्रोल, पाहा व्हिडिओ

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर जम्मू काश्मीरच्या संघातील खेळाडूंची संपर्क साधणे अतिशय कठिण झाले होते. सामन्यापूर्वी जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिक बुखारी यांनी यासंदर्भात माहिती सांगितली. ५ ऑगस्टचा दाखला देताना ते म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर याठिकाणी मोबाईल सेवा पूर्णपणे बंद होती. यापरिस्थितीत खेळाडूंशी संपर्क साधणे खूप कठिण झाले होते.

NZvsIND: कसोटी सामन्यापूर्व शास्त्रींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

स्थानिक दूरदर्शनच्या माध्यमातून खेळाडूंशी सपर्क करण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली. गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि अंधूक प्रकाश यामुळे नाणेफेक उशीराने झाली. कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दुपारी उशीराने सुरु झालेल्या खेळ पुन्हा थांबवण्याची वेळ आली तेव्हा कर्नाटकने अवघ्या १४ धावांत दोन गडी गमावले होते. यंदाच्या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखून जम्मू काश्मीर घरच्या मैदानावर बाजी मारणार की कर्नाटकचा संघ आगेकूच करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.