पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परदेशात फरार झालेला 'मॅच फिक्सर' पोलिसांच्या जाळ्यात

कर्नाटक लीगमध्ये मॅच फिक्सिंगमध्ये अनेक जणांना अटक करण्यात आले आहे.

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात रविवारी कथित आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील रहिवासी असलेला सय्याम वेस्ट इंडिजमध्ये पळून गेला होता. शनिवारी भारतात परतताच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला अटक केले.  

INDvsBAN : नागपूरचं मैदान मारत भारताचा टी-२० मालिकेवर कब्जा

मॅच फिक्सिंगसाठी सय्यामने लोकप्रिय ड्रम वादक बाफनाशी संपर्क केला होता. बाफनाच्या माध्यमातून त्याने बेलारी टस्कर्सच्या गोलंदाज गेलेला पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा सय्यामवर आरोप आहे. यापूर्वी कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात दोन क्रिकेटर्संना अटक करण्यात आली होती. त्यांना ७ दिवसांची पोलीस काठडी सुनावण्यात आली आहे.

 IPL 2020 : लखनऊसह या नव्या शहरातील मैदानात रंगणार सामने

गौतम आणि काझी या दोघांना कलम ४२० अंतर्गत अटक करण्यात आले होते. याशिवाय बंगळुरु ब्लास्टर्सचा फलंदाज निशांत सिंह शेखावत यांना बुकीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक एन. विनु प्रसाद यांनाही अटक करण्यात आले होते.