पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA हिंसक आंदोलनावर ज्वालाने व्यक्त केल्या मनातील भावना

ज्वाला गुट्टा

भारतीय बॅडमिंटन मिश्र दुहेरीतील स्टार महिला खेळाडू ज्वाला गुट्टा हिने सुधारित नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना शांतता राखा असे आवाहन तिने केले आहे. कायद्याला विरोध दर्शवत असताना कोणत्याही हिंसक गोष्टीला थारा देऊ नये, असा उल्लेखही तिने केला आहे. 

BLOG : पंतच्या प्रेमापोटी बीसीसीआयचा नवा प्रयोग

यासंदर्भात ज्वाला गुट्टाने ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आंदोलनाच्या दरम्यान हिंसक घटना समोर येत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. अनेकांनी आंदोलनामध्ये जीव देखील गमवावा लागाला आहे. या घटना अपेक्षित नव्हते. कोणीही हिंसेला बळ देऊ नये, असा संदेश तिने या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. आपणच आपल्या विरोधात हिंसा करत आहोत. आपण जगासाठी शांतीदूत आहोत. त्यामुळे पुढे येऊन हिंसेचा निषेध करायला हवा, असे आवाहन देखील तिने केले आहे. यापूर्वी क्रिकेटर हरभजन सिंगने देशवासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. 

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आसाममध्ये पेटलेले आंदोलन दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या माध्यमातून देशातील विविध भागात पसरल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान वेगवेगळ्या भागात पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी आंदोलन कर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या. दिल्लीतील जामिया विद्यापीठात घुसून दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर आरेरावी केल्याची चर्चाही रंगली. अद्यापही काही भागात आंदोलन सुरुच आहे. 

लिटल मास्टर अन् मास्टर ब्लास्टर यांनी घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

मोदी सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत काँग्रेसही या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. दुसरीकडे हा कायदा देशातील मुस्लिम समुदायाच्या विरोधात नसल्याचे सांगत भाजपने काँग्रेस हिंसेला समर्थन देत असल्याचा आरोप केला आहे.