पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्वाला गुट्टाचा प्रशिक्षक गोपीचंद यांच्यावर गंभीर आरोप

ज्वाला गुट्टा

भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाने राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची हितसंबंधांबाबत चौकशीची मागणी केली आहे. 'ज्वाला गुट्टा अकादममी ऑफ एक्सिलेंस' च्या उद्धाटनप्रसंगी ज्वालाने गोपीचंद यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. ज्वाला म्हणाली की, गोपीचंद मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे प्रमुख आहेत. त्यांची स्वत: ची अकादमी आहे. ते जिल्हा महासंघाचे अध्यक्ष आहेत. तेलंगणा संघटनेचे सचिव, खेलो इंडिया, पीबीएल यातील सहभाग, गो स्पोर्ट्समधील भागीदारी हे सर्व कागदोपत्री स्पष्ट दिसते.  

गब्बर वनडे मालिकेलाही मुकणार, मयांकला मिळणार संधी

ज्वालाने राष्ट्रीय शिबीर हे केवळ गोपीचंद अकादमीमध्ये आयोजिकत करण्यासंदर्भातही प्रश्न उपस्थित केलाय. ती म्हणाली, यापूर्वी मी बंगळुरु, जालंधर अशा वेगवेगळ्या शहरात शिबिरामध्ये सहभागी झाले आहे. पण २००६ पासून राष्ट्रीय शिबिर फक्त हैदराबाद स्थित गोपीचंद अकादमीतच होताना दिसते. मी याठिकाणी राहत असल्यामुळे मला याचा फायदाच आहे. पण हे चुकीचे आहे. 

धोनीसाठी मनापासून लिहिलेल्या विराटच्या 'त्या' पोस्टचाही अनोखा विक्रम

नव्याने सुरु केलेल्या अकादमीविषयी ज्वाला म्हणाली की, भारत खूप मोठा देश आहे. मात्र सध्याच्या घडीला सायना आणि सिंधू शिवाय अन्य नावे समोर येताना दिसत नाहीत. या अकादमीच्या माध्यमातून नवे खेळाडू बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील.