पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जितना उसके सिर पर बाल नहीं उतना मेरे पास माल है'

शोएब अख्तर आणि वीरेंद्र सेहवाग

युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जास्तीत जास्त सब्सक्राईबर मिळवण्यासाठी आणि त्यातून पैसा कमाविण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर भारतीय संघाचे कौतुक करतो, अशी टीका त्याच्यावर कायम होते. याच टीकाकारांना शोएबने उत्तर दिले आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवरील एका व्हिडिओत तो म्हणाला, जेव्हा भारतीय क्रिकेटपटू चांगले खेळतात. त्यावेळी त्यांचे कौतुक न करणारा पाकिस्तानमधील एकतरी युट्यूबर मला दाखवा. रमीझ राजा, शाहिद आफ्रिदी सगळेच जण त्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक करतात. आज भारतीय क्रिकेट संघ पहिल्या क्रमांकावर आहे ही वस्तुस्थिती आहे की नाही. विराट कोहली जगात सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे की नाही, हे सुद्धा समजून घेतले पाहिजे.

... आणि इंडिगोच्या त्या विमानाला इमर्जन्सी मोडवर मुंबईत परतावे लागले 

मी १५ वर्षे पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळलो. मला केवळ युट्यूबने प्रसिद्धी दिली नाही. शोएब अख्तर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज होता. त्यामुळे मला जगात प्रसिद्धी मिळाली. मला केवळ भारतातूनच सब्सक्राईबर मिळतात, असे मुळीच नाही. बांगलादेश, ऑस्ट्रेलियामधूनही माझा युट्यूब चॅनेल बघितला जातो, असेही शोएब अख्तरने सांगितले.

मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

याच व्हिडिओमध्ये त्याने एका जुन्या व्हिडिओचा दाखल देताना म्हटले आहे की, एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माझा मित्र वीरेंद्र सेहवाग त्या व्हिडिओत बोलताना दिसतो. तो म्हणतो की, मी (शोएब अख्तर) भारताबद्दल बोलतो कारण मला माहितीये की त्या पद्धतीने मला जास्त पैसे कमाविता येतील. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की, जेवढे त्याच्या (वीरेंद्र सेहवाग) डोक्यावर केस नाहीत तेवढे पैसे माझ्याकडे आहेत. अर्थात मी हे मजेत म्हणतो आहे. वीरूनेही हे हलकेच घ्यावे.