पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून या क्रिकेटर्संची ट्रम्प यांच्या विरोधात शाब्दिक फटकेबाजी

ट्रम्प यांनी सचिनच्या नावाचा चुकीचा उच्चार केला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवरील 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमातील आपल्या भाषणात विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. ट्रम्प यांनी सचिनचे नाव 'सूचीन' असे उच्चारल्याने दिग्गज क्रिकेटर्संनी ट्रम्प यांच्याविरोधात फटकेबाजी केली आहे. 

जगात भारी सचिन-विराटचे ट्रम्पही निघाले फॅन

ट्रम्प यांनी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचे नाव कधी ऐकलेच नसावे, अशा शब्दांत न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी नीशम याने ट्रम्प यांना शाब्दिक बाउन्सर मारला आहे. इंग्लडचा दिग्गज खेळाडून केविन पीटरसन याने देखील ट्रम्प यांची फिरकी घेतली आहे. सचिनच्या नावाचा उच्चार करण्यापूर्वी ट्रम्प यांनी थोडा रिसर्च (शोध) करायला हवा होता, अशी पीटरसनने दिली आहे. जेम्स अँड्रसन आणि मायकल वॉन यांनी देखील ट्रम्प यांच्यावर शाब्दिक मारा केला आहे.   

न्यूझीलंड दौऱ्यावर 'रनमशिन' बिघडली!

आयसीसीने ट्रम्प यांचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन शेअर केला आहे. 'सच, सच, सैच, सूच, सोच, याला कोणी ओळखत का? या प्रश्नार्थक कॅप्शनसह आयसीसीने ट्रम्प यांनी सचिनच्या नावाचा चुकीचा उच्चार केल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. यावर दिग्गज क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया येत असून अनेकांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात फटकेबाजी केली आहे.  

मोदी-ट्रम्प बैठकः भारताबरोबर ३ अब्ज डॉलरचा संरक्षण करार, पाकलाही सुनावले

दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात ट्रम्प यांनी भारतीय बॉलिवूडपासून सचिन तेंडुलकर ते विराट कोहली यांच्याबाबत भाष्य केले होते. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे महान क्रिकेटर भारतात असल्याचे म्हटले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:jimmy neesham kevin pietersen james anderson michael vaughan takes indirect jibe at Donald Trump for Soochin gaffe