पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : संतापलेल्या जयदेवने एका घावात स्टम्पचे दोन तुकडे केले, पण...

जयदेवने स्टम्पचे दोन तुकडे केल्याचे पाहायला मिळाले

रणजी चषक २०१९-२० हंगामातील अंतिम सामन्यात सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात लढत सुरु आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानात चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये आक्रमक तेवर पाहायला मिळाले. बंगालची चौथ्या विकेटसाठी जमलेली जोडी फोडता येईना म्हणून  सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकट संतापलेला दिसला. त्याने स्टम्प तोडून आपला रागाचा पारा किती चढलाय हेच दाखवून दिल्याचे अनुभूती दर्शकांनी अनुभवली. सोशल मीडियावर त्यासंदर्भातील व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

IND vs SA 1st ODI : पाऊस जिंकला, सामना रद्द!

सुदीप चटर्जी आणि वृद्धिमान साहा ही जोडी जमल्यानंतर जयदेव गोलंदाजी करत असताना त्याने फॉलो थ्रोमध्ये स्टम्प तोडल्याचे पाहयला मिळाले. उपहारापूर्वी हा सर्व प्रकार घडला. चटर्जी-साहा जोडीने सौराष्ट्र संघाच्या गोलंदाजांना चांगलेच दमवलं. विशेषकरुन साहाने उल्लेखनिय कामगिरी केली. विश्वराज जडेजाने सोडलेल्या झेलनंतर त्याने सौराष्ट्राच्या गोलंदाजाचे खांदे पाडले.   

कोरोना: क्रीडा मंत्रालयाकडून बीसीसीआयसह इतर संघटनांना सूचना

उपहारानंतर साहाच्या विरोधात कॉट हिहाइंडची अपील करण्यात आली. रिप्लायमध्ये झेल नसल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नाही तर जयदेवच्या गोलंदाजीवर पायचित दिल्यानंतर यशस्वी रिव्ह्यूच्या  माध्यमातून त्याने (साहा) आपली विकेट वाचवली.  सौराष्टकडून जयदेव घेऊन आलेल्या ९३ व्या षटकातील चौथा चेंडू चटर्जीने सावधरित्या गोलंदाजाच्या दिशेने खेळला. चेंडू हातात आल्यानंतर जयदेवने मिडल स्टम्पचा वेध घेतला. चटर्जी क्रिजमध्ये सुरक्षित होता. थ्रो एवढा जोराचा होता की स्टम्पचे दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले.

INDvsSA : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हे चित्र दिसले

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बंगाल संघाने ६ बाद ३५४ धावा केल्या होत्या. चटर्जी ८१ तर साहा ६४ धावा करुन माघारी फिरल्यानंतर मजुमदार ५८ तर अर्नब नंदी २८ धावा २८ धावांवर नाबाद खेळत होते. बंगाल अजूनही ७१ धावांनी पिछाडीवर आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Jaydev Unadkat loses his cool in Ranji Trophy final breaks middle stump during his follow through watch video