पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जसप्रीत बुमराहची होणार फिटनेस टेस्ट, समोर 'विराट' आवाहन

जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकांमधून भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहनं मघार घेतली होती.  पाठीला फॅक्चर असल्यामुळे त्यानं काही काळ विश्रांती घेतली होती. जसप्रीत आता मैदानात उतरण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी जसप्रीतची फिटनेस टेस्ट होणार आहे. 

Ranji Trophy : पृथ्वीच्या जोरावर मुंबईकरांनी बडोद्याच मैदान मारलं

जसप्रीतला पुढील आठवड्यात विशाखपट्टनमला बोलवण्यात आलं आहे. नेट सरावादरम्यान भारतीय संघासोबत जसप्रीत असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत पुन्हा एका जसप्रीतच्या गोलंदाजीची चाचणी होणार आहे. विराट आणि रोहित हे दोघंही सध्याच्या घडीचे आघाडीचे फलंदाज आहेत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गोलंदाजी करण्याचं आवाहन जसप्रीत समोर असणार आहे. पाठीच्या दुखापतीपासून तो पूर्णपणे बरा झाला आहे की नाही हे  पाहण्यात येणार आहे, अशी माहिती आयएएनएस वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं प्रकाशित केली आहे. 

ICC T20I Batting Rankings: विराट टॉप-10 मध्ये, रोहितची घसरण

भारतीय संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी बुमराह संघात असणं महत्त्वाचा आहे. तो भारतीय संघाचा उत्तम गोलंदाज आहे.  त्यामुळे सध्या कोणत्याही सामन्यात बुमराहला न खेळवता  दुखापतीपासून तो पूर्णपणे बरा होईपर्यंत वाट पाहण्याची तयारी मॅनेजमेंटची आहे.