श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा महान असून त्याच्याबरोबर आणि त्याच्या विरोधात खेळणे अभिमानास्पद असल्याचे भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने म्हटले आहे. बुमराह आयपीएलमध्ये मलिंगाबरोबर मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तर दोघांचा राष्ट्रीय संघ वेगवेगळा आहे. त्यावेळी दोघांनी एकमेकांचा सामना केला आहे.
'टॉपर' कोहलीला हिटमॅन रोहित देतोय 'फाइट'
बुमराहने शनिवारी याबाबत टि्वट केले आहे. तुझ्याबरोबर आणि विरोधात खेळणे अभिमानास्पद आहे 'लिजेंड', असे त्याने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
An honour to play with you and an honour to play against you! LEGEND 🎯 pic.twitter.com/SMjpeOaziV
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) July 6, 2019
शनिवारी श्रीलंकेचा भारताविरोधात अखेरचा साखळी सामना झाला. मलिंगाचाही हा अखेरचा सामना होता. मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मलिंगाला विजयी निरोप देण्याचे श्रीलंकन संघाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या सामन्यात श्रीलंकेचा ७ विकेट्सने पराभव झाला.
मलिंगाने आपल्या अखेरच्या सामन्यात १० षटकांमध्ये ८२ धावा देऊन केवळ १ विकेट घेतली होती. बुमराह २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना पहिल्यांदा मलिंगाला भेटला होता. तेव्हापासून दोघांची मैत्री जुळली. बुमराहने यॉर्कर आणि स्लोअर चेंडू टाकण्याची कला मलिंगाकडून शिकली आहे.