पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुमराहची गोंलदाजी शैली फलंदाजासह त्याच्यासाठीही धोक्याची : कपिल देव

बुमराह

भारतीय संघांचे माजी कर्णधार आणि भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजी शैलीबद्दल महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. बुमराहची गोलंदाजी शैली ही धोकादायक आणि दुखापतीला निमंत्रण देणारी असल्याचे  विधान त्यांनी केले आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून आपला दबदबा निर्माण करणारा बुमराह गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. गोलंदाजीच्या आपल्या हटके शैलीमुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने उल्लेखनिय कामगिरी केली असली तरी याच गोलंदाजी शैलीमुळे त्याला दुखापतग्रस्त व्हावे लागले आहे. 

INDvsWI T20 : सलामीचा सामना मुंबईऐवजी हैदराबादमध्ये, पण...

स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल देव यांनी बुमराहच्या गोलंदाजी शैलीवर भाष्य केले. भुवनेश्वर कुमार बुमराहपेक्षा अधिक काळ खेळू शकेल असेही ते म्हणाले. तंत्रशुद्ध गोलंदाजी गोलंदाजाला अधिक काळ मैदानात टिकवून ठेवते. बुमराह हा शरीरासोबत नाही तर केवळ हाताच्या जोरावर यश मिळवत आहे. त्याची ही शैली क्रिकेटच्या त्याच्या प्रवासात अडथळा ठरु शकते, असे ते म्हणाले.

 

'ती' खुश तर 'मी' खुश हे मला कळलंय : धोनी

यावेळी त्यांनी बिशन सिंग बेदी यांच्यासह लिटल मास्टर सुनील गावसकर आण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या तंत्रशुद्ध खेळीचे उदाहरण दिले. सुनील गावसकर आजही खेळताना डगमगणार नाहीत, सचिन आणखी पाचवर्षे सहज खेळला असता कारण ही मंडळी तंत्रशुद्ध खेळावर भर देणारी होती, असे कपिल यांनी सांगितले.