पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाक क्रिकेटर बुमराहला म्हणाला बच्चा, विराटवरही केलं भाष्य

जसप्रीत बुमराह

आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी असलेल्या आणि कसोटीत पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावणाऱ्या भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह फारसा प्रभावी नाही, असे मत पाकिस्तानी अष्टपैलू अब्दुल रझाकने व्यक्त केलय. अजब गोलंदाजी शैली आणि भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घायाळ करणाऱ्या बुमराह फार ग्रेट नाही, असे म्हणून रझाक थांबलेला नाही तर बुमराहला त्याने 'बेबी बॉलर' अशी उपमाही दिलीये. पाकिस्तानमधील एका व्हिडिओ मुलाखतीमध्ये त्याने बुमराहसह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर भाष्य केले. 

ICC Test Ranking: स्मिथला मागे टाकत कोहली पुन्हा अव्वलस्थानी

अब्दुल रझाक म्हणाला की, "मी जेव्हा क्रिकेट खेळायचो त्यावेळी मला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करावा लागायचा. त्यामुळे बुमराहचे फार कौतुक वाटत नाही. जर तो माझ्या विरुद्ध गोलंदाजी करत असता तर त्याच्यावर दडपण पाहायला मिळाले असते.  मी ग्लेन मॅग्रा, वासीम आक्रम, शोएब अख्तर यासारख्या गोलंदाजांना पाहिले आहे. त्यामुळे बुमराह मल्ला बच्चा वाटतो." 

देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र परवाना द्यावा, हिनाची शहांकडे मागणी

सध्याच्या घडीला विराट कोहलीचा फलंदाजीमध्ये दबदबा पाहायला मिळतो. यावर रझाक म्हणाला की, विराट हा सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तो एक चांगला क्रिकेटर निश्चितच आहे. पण त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत करता येणार नाही. १९९२ ते २००७ मध्ये क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडू होते. सध्याच्या घडीला हे चित्र दिसत नाही. क्रिकेटचा दर्जा हा पूर्वीसारखा राहिलेला नाही, असेही रझाकने म्हटले आहे.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Jasprit Bumrah a baby bowler would have easily dominated him Says Former Pakistan allrounder Abdul Razzaq