पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहित-बुमराह जोडीबद्द्लची ही गोष्ट तुम्हाला माहितीये?

जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघे आतापर्यंत ९८ सामन्यात एकत्र खेळले आहेत. पण कमालीची गोष्ट म्हणजे बुमराहने आतापर्यंत एकदाही रोहितसोबत फलंदाजी करण्याचा योग जुळून आलेला नाही. क्रिकेटमधील अनोख्या योगायोगाचा अनोखा विक्रम हा श्रीलंकन सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरन या जोडीच्या नावे आहे. 

कोरोना : दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द!

सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरन ४०८ सामन्यात एकत्र खेळले मात्र दोघांमध्ये एकत्र फलंदाजीचा योग हा कधीच जुळून आला नाही.  कोरोना विषाणूच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पूर्णत: बंद आहेत. परिस्थिती पुर्ववत झाल्यानंतर रोहित-बुमराह यांच्यातीलआतापर्यंतचा सिलसिला पुढील दोन सामन्यात कायम राहिला तर या जोडीच्या नावे अनोख्या शतकाची नोंद होईल.

लॉकडाऊनमुळे हिमा दासची हॉस्टेलमध्ये कोंडी!

रोहित आणि बुमराह यांनी आतापर्यंत चार कसोटी सामने, ५५ वनडे आणि ३९ टी २० सामन्यात मैदानात एकत्र उतरले.  रोहित शर्मा २०१३ पासून नियमित सलामीवीर म्हणून भारतीय संघासोबत आहे. बुमराहने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यत  १२८ सामन्यात ४२ वेळा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. यातील ३४ वेळा त्याने अकराव्या क्रमांकावर फंलदाजीला आला आहे.