पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Japan Open 2019: सिंधू-प्रणीतची उपांत्यपूर्व फेरीत धडक

पी.व्ही. सिंधू

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने जपान ओपनच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत सिंधूने जपानच्या आया ओहरीला ११-२१, २१-१०,२१-१३ असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर सिंधूने पुन्हा कमबॅक करत पुढील दोन सेटमध्ये आपला आक्रमक खेळ दाखवला.  

पुरुष एकेरीतही प्रणीतने भारताच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. त्याने जपानच्या सुनायामाला २१-१३,२१-१६ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत उपांत्यफेरी गाठली. उपांत्यफेरीत त्याच्यासमोर इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्टोचे आव्हान आहे. 

याशिवाय भारताच्या के एस. साईराज आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत आगेकूच कायम ठेवली आहे. या जोडीने चीनच्या हुआंग शियांग आणि लियू चेंग जोडीला १५-२१, २१-१५, २१-१९ पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली