पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या' चॅलेंजसाठी कॅलिसने अर्धी दाढी-मिशी काढली

जॅक कॅलिस

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैली जॅक कॅलिस सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कॅलिसने सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्धी दाढी आणि अर्धी मिशा अशा रुपातील एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा मजेशीर फोटो पाहिल्यानंतर पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का बसतोच. पण त्याने एका चॅलेंजसाठी हे सर्व केले आहे.  

विंडीजने २ दिवस २ तासांत ९ गडी राखून नोंदवला 'वजनदार' विजय

सोशल मीडियावरील जॅक कॅलीसचा नवा अवतार पाहून त्याच्या चाहते हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रियाही उमटल्या. मात्र त्याने आपल्या नव्या लूकचे कारण स्पष्ट केल्यानंतर नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहे.  

बुमराहची गोंलदाजी शैली फलंदाजासह त्याच्यासाठीही धोक्याची : कपिल देव

जॅक कॅलिसने त्याच्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरुन हाफ शेवसह एक फोटो शेअर केला आहे. आगामी काही दिवस खूप मजेशीर असणार आहेत. गेंडा आणि गोल्फच्या विकासाच्या कामासाठी हे सर्व सुरु आहे, असे कॅप्शन त्याने फोटोसह दिले आहे. ४४ वर्षी कॅलिसने दक्षिण अफ्रिकेतील 'सेव्ह द रायनो' चॅलेंज स्वीकारले आहे. या चॅलेंजमध्ये चेहरा आणि छातीवरील अर्धे केस काढायचे आहेत. याचा उद्देश गेंडा सवर्धनासाठी जागृकता निर्माण करण्याचा आहे.  'सेव्ह द रायनो' एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था पशूसंवर्धानासाठी कार्यरत आहे.