पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही सर्व राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होऊ : साक्षी मलिक

साक्षी मलिक

ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या भारताच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी प्रकार समावेश नसणे चुकीचे आहे, पण याचा निषेध म्हणून स्पर्धेवर बहिष्कार टाकणे योग्य ठरणार नाही, असे साक्षीने म्हटले आहे.  

राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी वगळ्यात आल्याने भारताने राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या हालाचाली सुरु केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव देखील केंद्र  सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. एका कार्यक्रमानंतर पीटीआयशी संवाद साधताना साक्षी म्हणाली की,  'राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकणे योग्य वाटत नाही.  नेमबाजी खेळाचा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश होईल. तसेच आम्ही सर्व  बर्मिंगहॅमध्ये रंगणाऱ्या  स्पर्धेत सहभागी होवू, असा विश्वासही तिने व्यक्त केला. 

राष्ट्रकुल स्पर्धा : बहिष्काराचा निर्णय इतर खेळाडूंसाठी अन्यायकारक : अभिनव बिंद्रा

भारतीय ऑलिम्पिक संघाने घेतलेल्या आक्रमक निर्णयाचे तिने समर्थनही केले. भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून जी पाउले उचलली जात आहेत ती योग्यच आहेत. जो खेळ वगळण्यात आला आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे फायदा होईल, असेही साक्षी यावेळी म्हणाली.  

भारताकडून राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली

याशिवाय साक्षीने हरयाणा सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्या खेळाडूला मिळणारी पुरस्कार राशी कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही टीका केली. आम्ही १५-२० वर्षे मेहनत घेऊन स्पर्धा गाजवतो. पुरस्कारामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. बक्षीस स्वरुपात मिळणारी राशी कमी केल्याने खेळाडूंसाठी निराशादायी असल्याचे ती म्हणाली.