भारतात होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना प्रवेश मिळेल का? अशी विचारणा दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय नेमबाजी महासंघाने भारताच्या राष्ट्रीय रायफल संघटनेकडे(एनआरएआय) केली आहे. दक्षिण कोरियामध्ये देखील कोरोना व्हायरसने कहर माजवला आहे. या कारणामुळे भारतात होणाऱ्या विश्वचषक नेमबाजीमध्ये सहभागी होण्याबाबतची भारताने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती दक्षिण कोरियाकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात दक्षिण कोरिया नेमबाजी महासंघाचे महासचिव योंगजी ली यांनी भारताच्या राष्ट्रीय नेमबाजी महासंघाचे अध्यक्ष रनिंदर सिंह यांना पत्र लिहिले आहे.
VIDEO: कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांनी केले सेलिब्रेशन
या पत्रात त्यांनी लिहिलय की, आम्ही भारतामध्ये १५ ते २६ मार्च दरम्यान होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छूक आहोत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळेल का? या प्रश्नामुळे खेळाडूंची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताची नक्की भूमिका काय राहिल हे कृपया स्पष्ट करावे. या स्पर्धेसाठी खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे तिकीट आरक्षित करण्यात आले असून व्हिजा शुल्कचा रक्कम देखील भरण्यात आली आहे, असा उल्लेखही त्यांनी पत्रामध्ये केलाय.
कोरोना : जपानच्या जहाजात अडकलेले ११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी परतले
बहरीनने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीन, ताईवान, हाँगकाँग, मकाऊ, उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान या राष्ट्रांनी कोरोनामुळे स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपसाठी चीनच्या कुस्तीपटूंना व्हिसा नाकारण्यात आला होता. वुहानमधील बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने हा निर्णय घेतला होता. चीनध्ये आतापर्यंत २ हजार ७०० हून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जगभरात ८० हजारापेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.