पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ISL : सहाव्या हंगामातील संघ बांधणीसाठी नवे नियम

आयएसएलच्या सहाव्या हंगामाची तयारी

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या हंगामात स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना नव्या नियमांसह मैदानात उतरावे लागणार आहे. फुटबॉल स्पर्धेतील रंजकता वाढवण्यासाठी इंडियन सुपर लीगमध्ये परदेशी खेळाडूंही खेळताना दिसतात. नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला ६ किंवा ७  परदेशी खेळाडूंसोबत करार करता येईल. ७ परदेशी खेळाडूंसह २५ खेळाडूंच्या संघात तीन  उद्योत्मुख खेळाडूंना संधी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी १९९९ असावा, असाही उल्लेख करण्यात आला आहे.  

धवनशिवायही भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो: मायकल हसी

खेळाडूंसोबत करार करण्यासंदर्भातील सॅलरी कॅप १७.५ कोटीवरुन १६.५ कोटी इतकी कमी करण्यात आली आहे. यात वार्षिक मानधन, बोनस आणि इतर खर्च समावेश असेल. सहभागी होणाऱ्या संघाला राखीव संघ बांधणी देखील करावी लागणार आहे.  क्लब आपल्या ताफ्यात लोकप्रिय खेळाडूची (मार्की प्लेअर) निवड करु शकतात. त्यांना दिले जाणारे मानधन हे सॅलरी कॅपशी संलग्नीत नसेल. जर एकपेक्षा अधिक मार्की प्लेअर संघात घेतले तर ज्याला सर्वाधिक मानधन दिले जाईल, ते खात्यामध्ये जमा करता येणार नाही. 

सहाव्या हंगमासाठी संघाना देण्यात आलेली मुदत पुढील प्रमाणे :

१ ऑगस्ट २०१९ : स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना १ ऑगस्ट प्रर्यंत मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करावी लागेल. 

३१ ऑगस्ट २०१९ : देशांतर्गत खेळाडूंच्या नावाची यादी देण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. यात राखीव खेळाडूंच्या नावाचाही समावेश असेल.

७ सप्टेंबर २०१९ :  परदेशी खेळाडू आणि लोकप्रिय खेळाडूसोबत करार करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.    

८ सप्टेंबर २०१९ : संघातील संपूर्ण खेळाडूंची यादी आणि त्यांना दिले जाणारे मानधन यासंदर्भातील माहिती ८ सप्टेंबरपर्यंत द्यावी लागेल.

२० सप्टेंबर २०१९ : पर्यंत संघातील खेळाडूंची यादी जमा करावी लागेल. 

बुमराहच्या यॉर्करवर विजय शंकर घायाळ, भारताला आणखी एक