पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फुकाची बडबड करणे हीच त्यांची वृत्ती, इरफानने घेतली रझाकची शाळा

बुमराह हा मला बच्चा वाटतो, असे वक्तव्य रझाकने केले होते.

भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला बच्चा म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या अष्टपैलू अब्दुल रझाकवर टीकेचा भडीमार झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी रझाकवर सोशल मीडियाच्या माध्यमात संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर आता भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने रझाकची बोलती बंद करणारा बाउन्सर मारलाय

पाक क्रिकेटर बुमराहला म्हणाला बच्चा, विराटवरही केलं भाष्य.  

इरफान पठाणने ट्विटच्या माध्यमातून अब्दुल रझाकचे नाव न घेता पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वत:बद्दल जावेद मियादांद यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत इरफानने रझाकचा समाचार घेतलाय. त्याने ट्विटमध्ये लिहलंय की, "इरफान सारखे गोलंदाज आमच्या गल्लीगल्ती दिसतात. पण जेव्हा जेव्हा हा गल्लीतील गोलंदाज त्यांच्यासमोर खेळला तेव्हा त्यांची दांड्यागुल केल्या आहेत." अशा प्रकारची वक्तव्ये फार मनावर घ्यायची नाहीत, असा उल्लेख इरफानने आपल्या ट्विटमध्ये केलाय.  

पैशांची अफरातफर प्रकरणात मेस्सी पुन्हा गोत्यात

२००४ मध्ये भारतीय संघ १५ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती त्यावेळी जावेद मियादांद यांनी इरफानसारखे गोलंदाज आमच्या गल्लीगल्तीत खेळतात, असे वक्तव्य केले होते. या मालिकेत इरफानने दमदार कामगिरी करुन दाखवली होती. त्याच्याबाबत ज्याप्रमाणे फुकाची बडबड केली गेली तशीच बडबड रझाकने बुमराहविषयी केल्याचे सूचक ट्विट करुन इरफानने बुमराहची पाठराखणच केली आहे.