पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इरफान पठाणसमवेत युवा क्रिकेटपटूंनी काश्मीर सोडले

इरफान पठाण

जम्मू-काश्मीर राज्याच्या क्रिकेट संघाचा मार्गदर्शक आणि टीम इंडियाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण आणि संघ निवडीसाठी आलेले क्रिकेटपटू आपापल्या घरी परतले आहेत. काश्मीर खोऱ्यातील सध्याची परिस्थिती पाहता श्रीनगर येथे १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील निवड स्थगित करण्यात आली आहे. राज्य प्रशासनाने सर्व पर्यटक आणि अमरनाथ यात्रेकरुंना दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातून परतण्याची सूचना करण्यात आली आहे. 

अटलबिहारी वाजपेयींची आज उणीव भासत आहेः मेहबूबा मुफ्ती

इरफान पठाण १६ वर्षांखालील (विजय मर्चंट चषक) आणि १९ वर्षांखालील (कूचबिहार चषक) क्रिकेट सामने पाहण्यासाठी संभाव्य खेळाडुंची यादी तयार करण्यासाठी श्रीनगरला गेला होता. पठाणने रविवारी पीटीआयला सांगितले की, आम्ही सध्या कनिष्ठ संघाच्या दुसरी चाचणी स्थगित केली आहे. आमचा पहिला टप्पा जून आणि जुलैमध्ये पार पडला होता. हा दुसरा टप्पा होता. सरकारकडून सूचना जारी करण्यात आल्याने जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुखारी आणि प्रशासक न्या. प्रसाद यांची भेट घेतली. त्यानंतर मुलांना परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जम्मू-काश्मीरः मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्लांसह अनेक नेते नजरकैदेत; कलम १४४ लागू

सर्व खेळाडू घरी गेल्यानंतरच पठाणने श्रीनगर सोडले. सर्व मुले सुखरुप घरी गेल्याचे समजल्यानंतरच मी श्रीनगर सोडणार होतो. त्यांचे पालक चिंतेत होते, हे मी समजू शकतो. मी काही पालकांबरोबर फोनवर संवाद साधला. आता सर्वजण घरी पोहोचले आहेत. त्यामुळे मी आता श्रीनगर सोडत आहे, असे इरफानने म्हटले.