पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: क्रीडा मंत्रालयाकडून बीसीसीआयसह इतर संघटनांना सूचना

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू

खेळाच्या मैदानात प्रेक्षकांची गर्दी जमवू नका, अशा सूचना क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने देशातील क्रीडा संघटनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाचाही (बीसीसीआय) समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी एकदिवसीय सामने प्रेक्षकांशिवाय खेळवावे लागणार आहेत. क्रिकेटच नव्हे तर देशातील क्रीडा संघटनांना या नियमाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. 

'कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस यायला दीड ते दोन वर्षे लागतील'

स्पर्धा रद्द करणे शक्य नसेल तर प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळवण्यास कोणतीही हरकत नाही, असे क्रीडा मंत्रालयाने म्ह्टले आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या भूमिकेमुळे आयपीएल स्पर्धेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर स्पर्धा आयोजकांना आणि क्रीड संघटनांना योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. यापूर्वी 'रोड सेफ्टी सीरीज' स्पर्धेतील सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील धर्मशाला येथील  पहिल्या सामन्यावेळी प्रेक्षकांवर कोणतीही बंदी नव्हती. परिणामी अनेक प्रेक्षक आल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता या मालिकेतील लखनऊ आणि कोलकाताच्या मैदानातील सामने हे प्रेक्षकांशिवायच खेळवावे लागणार आहेत.

'दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना खबरदारी म्हणून विलगीकरण

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरातील ११८ देशांत कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. जवळपास १ लाख २० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरातून आतापर्यंत ४ हजार ३०० लोकांचा या रोगाने बळी घेतला आहे. दिवसेंदिवस वाढणारा आकड्यामुळे कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IPL rest of India SA series and all other sporting event could be played without spectators