पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2019 : या विक्रमासह ऑरेंज कॅप वॉर्नरकडेच राहणार!

डेव्हिड वॉर्नर

आयपीएलच्या बाराव्या हंगामात हैदराबाद सनरायजर्सकडून मैदानात उतरलेल्या डेव्हिड वार्नरने विशेष छाप सोडली आहे. हैदराबादचा प्रवास हा एलिमिनेटर राउंडमध्येच संपला. यापूर्वी साखळी सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नर हा विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मायदेशी परतला. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धाव करण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. 

IPL 2019 : जाता-जाताही वॉर्नर तडाखे देऊन गेला!

डेव्हिड वॉर्नरने १२ सामन्यातील १२ डावात एक शतक आणि ८ अर्धशतकांसह ६९२ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. अंतिम सामन्यात दाखल झालेल्या संघातील कोणत्याच फलंदाजाकडे त्याला मागे टाकण्याची संधी उरलेली नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी ऑरेंज कॅपचा मानकरी वॉर्नरच राहणार हे पक्के आहे. २०१५ आणि २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतही डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅपचा बहुमान मिळवला होता. यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा तो ऑरेंज कॅप मिळवण्याचा पराक्रम त्याच्या नावे नोंद होईल. २००८ पासून २०१९ पर्यंत रंगलेल्या आयपीएल हंगामात सर्वाधिकवेळा ऑरेंज कॅप पटकणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज असेल. त्याच्याशिवाय ख्रिस गेलने दोन वेळा ऑरेंज कॅप मिळवली आहे. 

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाज बॅकफूटवरच!

सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा लोकेश राहुल १४ सामन्यात ५९३, दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन १६ सामन्यात ५२१, कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल १४ सामन्यात ५२१ आणि मुंबई इंडियन्सचा क्विंटन डी कॉक १५ सामन्यात ५०० धावांसह पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबई इंडियन्स आज (रविवार) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर असलेल्या वॉर्नरला मागे टाकण्याच्या शर्यतीत या संघातील कोणताही फलंदाज नसल्यामुळे ऑरेंज कॅपची फक्त औपचारिकताच उरली आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IPL Orange Cap 2019 David Warner remains only batsman to cross 600 runs with KL Rahul in second spot