पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'IPL च्या यजमानपदासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून कोणताही प्रस्ताव नाही'

यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा होणे असंभव झाले आहे (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आलेल्या आयपीएल स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला मिळावे, याबाबत कोणताही प्रस्ताव बीसीसीआयकडे आलेला नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी एका मुलाखतीमध्ये भारतातील लोकप्रिय आयपीलएल स्पर्धेचे यजमानपदास तयारी दर्शवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने असा कोणताही अधिकृत प्रस्ताव श्रीलंकन बोर्डाकडून आलेला नाही, असे सांगितले. सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाचे संकट असून अशा प्रस्तावाबाबत विचार होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यांचे हे वक्तव्य यंदाच्या वर्षी आयपीएल स्पर्धा रद्द होण्याचे संकेत देणारे आहे.  

दिलासादायक, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत मोठी वाढ

जगभरासह देशात कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालवधी ३  मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भारतातील लोकप्रिय आयपीएल क्रिकेट स्पर्धेवरील संकट आणखी गडद झाले असून या स्पर्धेचा कांउटडाऊनही वाढला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची अधिकृत घोषणा केली. बीसीसीआयच्या या घोषणनेनंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या नियोजनासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केले आहे. श्रीलंकेतील कोरोनाची परिस्थिती लवकर नियंत्रणा येईल. या परिस्थिती आयपीएल २०२० चे आयोजनासाठी आम्ही सकारात्मक विचार करु, असे त्यांनी म्हटले आहे. 

अ‍ॅथलेटिक्सपटूंना दिलासा! ऑलिम्पिक पात्रतेसाठी योग्य ती संधी मिळणार

श्रीलंकेत कोरोना विषाणूचा सर्वाधिक कमी रुग्ण आढळले आहेत. याठिकाणी आतापर्यंत सात लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १३ हजारहून अधिक असून आपल्याकडे आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. भारतातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दोनवेळा आयपीएल स्पर्धाही इतर देशात खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. २००९ मध्ये संपूर्ण आयपीएल स्पर्धा ही दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. तर २०१४ च्या आयपीएल स्पर्धेतील काही सामने हे युएईमध्ये खेळवण्यात आले होते.