पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भज्जीने इंस्टावरुन सांगितली वॉटसनच्या रक्तबंबाळ इनिंगची कहाणी

शेन वॉटसन

आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर शेन वॉटसनने कडवी झुंज दिल्याचे आपण पाहिले. या सामन्यात अखेरच्या षटकात फटकेबाजी करत शेन वॉटसनने सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला होता. मात्र अखेरच्या षटकात तो धावबाद झाल्यानंतर चेन्नईचे चौथ्यांदा आयपीएल उंचावण्याचे स्वप्नचं भंगले. वॉटसनची खेळी कमालीची होती यावर कोणीही शंका घेणार नाही, पण हरभजनने त्याच्या खेळीसंदर्भात केलेला खुलासा हा शेन वॉटसनच्या खेळीला सलाम करायला लावणारा आहे.  

'वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला पंतची उणीव भासेल'

शेन वॉटसनच्या झुंजार ८० धावांच्या खेळीबद्दल हरभजनने एक खुलासा केला आहे. या सामन्यात डाइव्ह मारताना वॉटसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. गुडघ्यातून रक्तस्त्राव होत असताना ही गोष्ट कोणालाही न सांगता वॉटसन फलंदाजी करत राहिला. तो शवटपर्यंत लढला, अशा शब्दात हरभजनने त्याच्या खेळीचे कौतुक केले. हरभजन सिंगने इन्टाग्रामच्या माध्यमातून वॉटसनच्या झुंजार खेळीचा एक फोटो शेअर केला आहे. सामन्यानंतर वॉटसनच्या गुडघ्याला सहा टाके घालण्यात आल्याचा उल्लेखही हरभजनने यात केला आहे.

 

IPL Final : 'त्या' अभद्र टिप्पणीबद्दल समालोचकाला मागावी लागली माफी

वॉटसनने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात ५९ चेंडूमध्ये ८ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ८० धावांची खेळी केली होती. अखेरच्या षटकात दोन धावा घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. हा सामना चेन्नई सुपर किंग्जने अवघ्या एका धावेन गमावला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ipl final harbhajan singh reveals shane watson batted through bloodied leg in final vs mumbai indians