पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL लिलावावेळी दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण आहे ?

सनरायजर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची २७ वर्षीय कन्या काव्या मारन

आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा राहिला. यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला. दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर १५.५० कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले. कमिन्सला घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रस्सीखेच दिसून आली. पण नंतर केकेआरने सर्वाधिक बोली लावली. गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये मिस्ट्री गर्ल्सची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली आहे. आयपीएलदरम्यान कोणती ना कोणती मुलगी अचानक सोशल मीडियावर चर्चेत येते. यावर्षीही अशीच एक मिस्ट्री गर्ल चर्चेचा विषय बनली आहे.

IPL : युसूफ पठाण 'खपला'च नाही, अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी

गुरुवारी आयपीएल २०१९ च्या लिलावादरम्यान सनरायजर्स हैदराबादचा मेंटॉर व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि प्रशिक्षक ट्रेवर बोलिसच्या बाजूला एक मिस्ट्री गर्ल नजरेस पडली. तिच्याकडे सातत्याने कॅमेरा जात होता. सनरायजर्स हैदराबादला आपला पहिला खेळाडू खरेदी करण्यासाठी सुमारे एक तासांचा वेळ लागला. परंतु, तोपर्यंत मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. 

ही मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कोणी नसून सनरायजर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची २७ वर्षीय कन्या काव्या मारन आहे. ती या संघाची सहमालकीण देखील आहे. तिचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी झाला होता. काव्या क्रिकेटची चाहती आहे. हैदराबादच्या प्रत्येक सामन्यावेळी ती स्टेडिअममध्ये उपस्थित असते.

IPL Auction 2020 : ऑस्ट्रेलियन कोट्यवधीत खेळले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ipl auction who is mystery girl on the sunrisers hyderabad table during the ipl auction 2020