पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ipl Auction : दिल्लीकरांची परदेशी खेळाडूवर नजर

रिकी पाँटिंग

आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी कोलकातामध्ये होणाऱ्य़ा खेळाडूंच्या लिलावात नव्याने संघ बांधणी करण्याची रणनिती पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच कोलकातामध्ये पार पडणाऱ्या लिलावात प्रत्येक संघ आपल्या संघातील ताकद वाढवण्याच्या उद्देशाने खेळाडूवर बोली लावताना दिसेल. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी संघाच्या रणनितीवर भाष्य केले. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी लिलावासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. 

IPL Auction 2020 : जाणून घ्या लिलावासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

त्याने ट्विटमध्ये लिहलंय की, आम्ही दोन अष्टपैलू खेळाडू आणि दोन जलदगती गोलंदाज ताफ्यात सामील करण्यावर भर देणार आहोत. आमच्याकडे सध्याच्या घडीला उत्तम भारतीय खेळाडू असल्याचे सांगत दिल्लीच्या ताफ्यात परदेशी खेळाडूंची वर्णी लागू शकते असे संकेतच त्यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. ते खेळाडू कोणते असणार ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत आयपीएलची स्पर्धा जिंकलेली नाही.

अफलातून खेळीदरम्यान श्रेयसची मज्जा, विराटलाही हसू आवरले नाही

पण मागील स्पर्धेत पाँटिग आणि गांगुल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती. यंदाच्या लिलावत चांगल्या खेळाडूंना पसंती देत संघ मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पेट कमिन्स आणि क्रिस वोक्सकडे यांना आपल्या ताफ्यात घेण्याचा दिल्ली कॅपिटल्स प्रयत्न करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ipl auction live updates delhi capitals head coach ricky ponting reveal strategy of his team before auction starts