पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पैशांचा पाऊस! कमिन्ससाठी 'कोलकाता'ने मोजली मोठी किंमत

पॅट कमिन्स

कोलकातामध्ये सुरु असलेल्या खेळाडूंच्या लिलावातील पहिल्या सत्रात परदेशी खेळाडूंना चांगला भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर आणि ग्लेन मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेण्यासाठी फ्रंचायझीमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.  

रॉयल चॅलेंज बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी पॅट कमिन्सला १४ कोटींच्या घरात नेऊन ठेवले. या दोन्ही संघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली असताना कोलकाता नाईटने यात उडी घेतली. त्यांनी तब्बल १५ कोटी ५० लाखची बोली लावत कमिन्सला आपल्या ताफ्यात घेतले. 

धमाकेदार फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. किंग्ज इलेव्हनने त्याच्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतले.  

या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसलाही १० कोटी इतकी तगडी किंमत मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. मॉरिसशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अ‍ॅरॉन फिंचसाठी ४ कोटी ४० लाख मोजले. सॅम कुरनला चेन्नई सुपर किंग्जने ५ कोटी ५० लाख इतकी रक्कम मोजली.