पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020 : लखनऊसह या नव्या शहरातील मैदानात रंगणार सामने

आयपीएलची उत्सकता

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी हंगामात तीन नवीन ठिकाणी सामने खेळवण्याचा विचार सुरु आहे. तसेच काही नवीन संघही सामील होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र नवीन संघांच्या समावेशासाठी क्रिकेट प्रेमींना २०२१ च्या हंगामाची वाट पाहावी लागेल.  

INDvBAN 3rd T20: कर्णधार रोहितचे पंतविषयी मोठं विधान

आगामी २०२० च्या हंगामाच्या पार्श्वभूमीवीर बीसीसीआयच्या मुख्यालयात आठ फ्रेंचाइजीच्या बैठकीत तीन नव्या शहरातील स्टेडियमवर सामने खेळवण्याबाबत चर्चा झाली. लखनऊ, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याबात चर्चा करण्यात आली आहे.  

कांगारुंना पुन्हा धक्का! आणखी एकाने तणावामुळे घेतली माघार

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ लघनऊला आपले दुसरे घरचे मैदान म्हणून पसंती देऊ शकतो. दुसरीकडे राजस्थानचा संघ घरचे मैदान म्हणून अहमदाबादशिवाय गुवाहाटीला प्राधान्य देण्यास इच्छूक आहे. तिरुअनंतपूरम कोणत्या संघ पसंती देईल हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. आयपीएलची गवर्निंग काउंसिल याबाबत सकारात्मक असल्याचेही अधिकाऱ्याने म्हटले आहे.