दिर्घकालीन विश्रांतीमुळे ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती, तो माही अर्थात महेंद्रसिंह धोनी सरावासाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी तब्बल ८ महिन्यानंतर धोनी सरावाला सुरुवात करणार आहे. १ मार्चपासून धोनी नेटमध्ये पुन्हा एकदा मेहनत घेताना दिसणार आहे.
तुझी बोटं छाटून टाकू; आर अश्विनला विरोधी संघाने दिली होती धमकी
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्ध तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आयपीएलमधील कामगिरी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी धोनीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी केली होती. मात्र त्याला फिनिशिंग इनिंग खेळण्यात अपयश आले होते.
फाफ ड्युप्लेसीनं दक्षिण आफ्रिकन संघाचे नेतृत्व सोडले
या सामन्यात तो धावबाद झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत धोनी एकाही सामन्यात खेळलेला नाही. एवढेच नाही तर आयसीसीने खेळाडूंसोबत केलेल्या करारामध्येही त्याच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे धोनीची आंतरराष्ट्रीय कारकिर्दी संपल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. दरम्यान बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनी निवृत्तीचा निर्णय हा धोनीचा असेल, असे म्हटले होते. धोनी एकदिवसीयमधून निवृत्ती घेईल आणि टी-२० खेळत राहील, अशी भविष्यवाणी करत रवी शास्त्री यांनी आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनीचा विचार होऊ शकतो, याचे संकेत दिले होते.