१३ व्या हंगामातील आयपीएल स्पर्धेच वेळापत्रक निश्चित झाले आहे. २९ मार्च २०२० ते २४ मे २०२० या कालावधीमध्ये यंदा स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत आठ संघाचा समावेश असून राजस्थान रॉयल्सच्या संघाने जयपूर आणि गुवाहाटीला घरच्या मैदानाची पसंती दिली आहे. या संघाशिवाय अन्य सात संघांनी नियमित घरच्या मैदानालाच पसंती दिली आहे.
IPL 2020: साखळी फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
बीसीसीआयच्या लोढा समितीच्या शिफारशीकडे यंदाच्या स्पर्धेत दुर्लक्ष करण्यात आल्याचे वेळापत्रकावरुन दिसून येते. आंतरराष्ट्रीय सामना आणि आयपीएल स्पर्धेचा सलामीचा सामना यात किमान १५ दिवसांचे अंतर असायला हवे, अशी शिफारस लोढा समितीने केली होती. भारतीय संघ १८ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे. त्यानंतर २९ मार्चला आयपीएलचा शुभारंभ होईल. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय सामना आणि आयपीएलमधील शुभारंभ सामना यात अवघ्या ११ दिवसांचे अंतर आहे.
Video : मास्टर ब्लास्टर सचिन ठरला लॉरियस पुरस्काराचा मानकरी
यंदाच्या आयपीएलमध्ये काही नव्या नियमांचा प्रयोग देखील करण्यात येणार आहे. १३ व्या हंगामातील स्पर्धेपासून कन्कशन सब्स्टीट्यूट नियम लागू करण्यात येणार आहे. या नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली तर त्याच्या बदली दुसऱ्या खेळाडूला जागा घेता येईल. याशिवाय फ्रंटफूट नो बॉल पाहण्यासाठी अतिरिक्त पंचांची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे.