पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: माही-रैनाच्या गळाभेटीनं नेटकरी वेडावले

धोनी आणि रैना

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० ची धमाकेदार सुरुवार २९ मार्चपासून होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोमवारी रात्री चेन्नईमध्ये दाखल झाला. हॉटेलमध्ये पोहचलेल्या धोनीला पाहून सुरेश रैनाने गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्सने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

स्पर्श केल्यावर पुरुषाचा हेतू महिलेला कळलेला असतो - मुंबई हायकोर्ट

आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्स सज्ज झाली असून त्यांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. ७ महिन्यांनंतर सामना खेळण्यासाठी आलेल्या महेंद्र सिंह धोनीला पाहून सुरेश रैना भावुक झाला. त्याने धोनीची गळाभेट घेतली. धोनी आणि रैनाच्या गळाभेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याला पाहून नेटकरी वेडावले आहेत.

कोरोनामुळे घाबरण्याचे कारण नाही, नरेंद्र मोदींचे ट्विट

धोनी आणि रैना अनेक वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतात. क्रिकेटप्रेमींना धोनी आणि रैना यांची जोडी खूप आवडते. दरम्यान, आयसीसी वर्ल्ड कप २०१९ च्या उपांत्य फेरीनंतर महेंद्र सिंह धोनी क्रिकेटपासून दूर आहे. प्रत्येक जण धोनी मैदानावर परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

CAAला विरोध करणाऱ्या ५ परदेशी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश