पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: दादा ठाम असताना राज्याचे मंत्री म्हणाले, आता IPL स्पर्धा नकोच!

आयपीएल स्पर्धेवर कोरोनाचे सावट

कोरोनाच्या प्रादुर्भाचा प्रभाव आयपीएलवर होण्याचे संकेत दिसत आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी योग्य ती खबरदारीसह आयपीएल स्पर्धा नियोजित वेळेत होईल, असे म्हटले असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

कोरोनामुळे IPL वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही : गांगुली

राजेश टोपे म्हणाले की, देशभरात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. आयपीएलसारख्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यास कोरानाचा प्रभाव वाढण्याची भिती आहे. ही वेळ आयपीएलसारख्या स्पर्धेसाठी योग्य नाही. ही स्पर्धा पुढे ढकलण्याची गरज असून यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करणार आहोत, अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. २९ मार्चपासून वानखेडेच्या मैदानातून आयपीएल स्पर्धेचा शुभारंभ होणार असल्याचे नियोजित आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी स्पर्धा नियोजित वेळेनुसार होईल, असे म्हटले होते. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यामुळे बीसीसीआय याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

INDvsAUS फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन PM अन् मोदींच्यात रंगला सामना

दोन दिवसांपूर्वीच सौरव गांगुली यांनी नियोजित वेळेत स्पर्धा खेळवली जाईल, असे म्हटले होते. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार योग्य खबरदारी घेतली जाईल, असा उल्लेखही गांगुली यांनी केला होता. त्यामुळे आयपीएलच्या नियोजनावरुन राज्य सरकार आणि बीसीसीआय वाद रंगणार की कोरोनाच्या मुद्यावरुन बीसीसीआय राज्य सरकारच्या सल्ल्यासंदर्भात सकारात्मक विचार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.