पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPLची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली, बीसीसीआयचा निर्णय

ड्वेन ब्रावो आणि महेंद्रसिंह धोनी

कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आयपीएलच्या नियामक परिषदेकडून शनिवारी शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती मिळते आहे. आयपीएलच्या नियामक परिषदेची बैठक शनिवारी होते आहे.

सरकार मुंबईकरांना सॅनिटायझर आणि मास्क मोफत वाटणार: पालकमंत्री

इंडियन प्रिमिअर लीगमधील ट्वेंटी-२० क्रिकेट सामने २९ मार्चपासून सुरू होणार होते. पण कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय विविध राज्य सरकारांकडून घेतला जात आहे. त्याचबरोबर आयपीएल सामन्यांसाठी प्रेक्षकांना तिकीट विकू नये. मैदानात प्रेक्षकांशिवाय हे सामने खेळवले जावेत. तरच त्याला परवानगी दिली जाईल, अशी भूमिका महाराष्ट्रासह काही राज्य सरकारांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयपीएलपुढे पेच उभा राहिला आहे.

इराणमध्ये अडकलेले भारतीय विशेष विमानानं मुंबईत

दुसरीकडे भारताने अनेक देशांतील नागरिकांना व्हिसा देण्यावर १५ एप्रिलपर्यंत निर्बंध घातले आहेत. त्यामुळे परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर आयपीएल नियामक परिषद काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.