पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020: 'काय पो छे' मधील बीडचा कलाकार मुंबई इंडियन्सकडून खेळणार

दिग्विजय देशमुख आणि सुशांतसिंह राजपूत

आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच झाला. आयपीएल २०२० लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता येथे झाला. या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्विजय देशमुखला खरेदी केले. दिग्विजयने एका चित्रपटातही काम केले आहे. २०१३ मध्ये आलेला हिंदी चित्रपट 'काय पो छे'मध्ये अली या नावाची भूमिका निभावणारा बालकलाकार हा दिग्विजय होता. अलीची भूमिका या चित्रपटात अत्यंत महत्त्वाची होती. या चित्रपटात सुशांतसिंह राजपूत, अमित साध आणि राजकुमार राव सारख्या मोठ्या कलाकारांचा यात समावेश होता.

एक पाऊल पुढे!, राहुल द्रविडच्या मुलाचं खणखणीत द्विशतक

२१ वर्षीय दिग्विजयने एक प्रथम श्रेणी सामना आणि ७ टी २० सामने खेळले आहेत. लिलावात त्याची बेस प्राईस ही २० लाख रुपये होती. मुंबई इंडियन्सने त्याला बेस प्राईसला खरेदी केले आहे. दिग्विजय उजव्या हाताने फलंदाजी करतो. तो वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १०४ धावा केल्या असून १५ विकेटही घेतल्या आहेत. मुळचा बीड जिल्ह्यातील असलेल्या दिग्विजयने मागील हंगामात महाराष्ट्रकडून पदार्पण केले होते. जम्मू-काश्मीरविरोधात खेळताना त्याने ६१ धावा केल्या होत्या.

IPL लिलावावेळी दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण आहे ?

'काय पे छे' चित्रपटात दिग्विजयने युवा क्रिकेटपटू अलीची भूमिका केली होती. चित्रपटात त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा असल्याचे दाखवण्यात आले होते. 

दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाथन कूल्टर नाईलला ८ कोटी रुपयांना खरेदी केले. नाथनला संघात घेण्यासाठी चेन्नई आणि मुंबईत रस्सीखेच सुरु होती. अखेर मुंबईने यात बाजी मारली. त्याचबरोबर मुंबईने ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिनला २ कोटींना खरेदी केले.

प्रियम गर्ग १ कोटी ९० लाख, जाणून घ्या कोणाला कुणी अन् किती पैसे मोजले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ipl 2020 auction indian premier league 13th season mumbai indians baught digvijay deshmukh who has done a bollywood movie Kai Po Che with sushant singh rajput