पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020 Auction: जाणून घ्या लिलावाची वेळ आणि बरचं काही

आयपीएल लिलावाची उत्सुकता शिगेला

इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० मधील हंगामासाठी १९ डिसेंबरला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. कोलकातामध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामातील  लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ शार्टलिस्‍टेड खेळाडूंवर बोली लागणार आहे.  

IPL 2020 Auctions : टॉप बकेटमध्ये दोन भारतीयांसह चार परदेशी खेळाडू

लिलाव प्रक्रियेला गुरुवारी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल. यावेळी फ्रँचायझींना १४ वर्षांपासून ते ४८ वर्षापर्यंतच्या खेळाडूवर बोली लावता येणार आहे. अफगानिस्तानच्या नूर अहमद १४ वर्षांचा असून भारताचा प्रवीण तांबे ४८ वर्षांचा आहे.  

कधी आणि कोणत्यावेळी होणाल खेळाडूंचा लिलाव

गुरुवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी कोलकातामध्ये लिलावाला सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना लिलाव प्रक्रिया पाहता यावी यासाठी गेल्या काही हंगामापासून वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत लिलाव प्रक्रिया सुरु राहणार आहे.  

बाबर बघतोय विराटची बरोबरी करण्याची स्वप्नं

 स्टार स्पोर्ट्सवर लिलावाचे प्रेक्षपण क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे. याशिवाय हॉटस्टार (hotstar.com)  लाइव स्ट्रीमिंगचा आनंदही घेता येईल. ग्लेन मॅक्सवेल, इयोन मॉर्गन, ख्रिस लीन, फिंच, शाय होप, शिम्रॉन हेटमायर पेट कमिंन्स यांच्यासह अन्य तगडे खेळाडू घेण्यासाठी आठ फ्रँचायझीमध्ये चुरस पाहायला मिळेल 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ipl 2020 auction date 19th december ipl auction full players list When and where to watch Live Streaming Players list Schedule News and all updates