पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : विक्रमी बोलीनंतर पॅट कमिन्सनं दिली अशी रिअ‍ॅक्शन

पॅट कमिन्स

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी असलेल्या पॅट कमिन्सला आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात मोठी रक्कम मिळाली. नाइट रायडर्सने त्याच्यासाठी तब्बल १५ कोटी ५० लाख एवढी रक्कम मोजली. २०१७ च्या आयपीएल हंगामासाठी पुण्याच्या संघाने १४ कोटी ५० लाख खर्च करुन बेन स्टोक्सला खरेदी केले होते. आयपीएलमधील हा विक्रम आज मोडीत निघला. पॅट कमिन्स आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.  

पैशांचा पाऊस! कमिन्ससाठी 'कोलकाता'ने मोजली मोठी किंमत

आयपीएलमधील या विक्रमानंतर पॅट कमिन्सने एक व्हिडिओ शेअर करुन आनंद व्यक्त केला. कोलकाताकडून खेळण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे.  व्हिडिओच्या माध्य या विक्रमी बोलीनंतर पॅट कमिन्सने एका व्हिडीओद्वारे आपला आनंद व्यक्त केला असून, कोलकात्याकडून खेळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्याने म्हटले आहे. 

Video : कॅरेबियन पठ्ठ्याचा रोहितच्या खेळीला सलाम

२०१९ मध्ये विश्वचषक स्पर्धेमुळे पॅट कमिन्स आयपीएलच्या मैदानात उतरला नव्हता. यापूर्वी  २०१४ मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स तर २०१५ मध्ये दिल्लीकडून खेळताना दिसले होते. दोन्ही संघाकडून एकूण १६ सामन्यात त्याने १७ बळी मिळवले आहेत. आगामी आयपीएलमध्ये तो पुन्हा एकदा कोलकाताच्या ताफ्यातून दिसणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ipl 2020 auction australia pat cummins becomes reaction after highest bet of 15 crore 50 lakhs by kolkata knight riders