पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IPL 2020 Auction: ९७१ क्रिकेटर्सची नोंदणी, यात २०० हून अधिक परदेशी

आयपीएलच्या १३ हंगामाची उत्कंठा शिगेला

IPL 2020 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामासाठी कोलकातामध्ये १९ डिसेंबरला लिलाव होणार आहे. लिलावापूर्वी आठ संघांनी रिटेन केलेल्या (संघासोबत कायम ठेवलेल्या) आणि  रिलीज केलेल्या (दुसऱ्या संघात जाण्याची परवानगी दिलेल्या ) खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता १९ डिसेंबरला कोलकातामध्ये होणाऱ्या खेळाडूंच्या २०२० च्या हंगामातील लिलावासासाठी ९७१ खेळांडूनी नोंदणी केली आहे. यात २०० हून अधिक परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.    

टी-20 विश्व विक्रम : १३ चेंडूत एकही धाव न देता ६ विकेट घेणारी मर्दानी!

भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी एका पत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ३० नोव्हेंबर ही लिलावासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारिख होती. अखेरच्या तारखेपर्यंत ९७१ खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. यात ७१३ भारतीय तर २५८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.  

सनी लिओनीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

लिलावाच्या माध्यमातून ७३ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले २१५ खेळाडू शर्यतीत असतील. याशिवाय एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या ७५४ खेळाडूंनी पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली आहे. याशिवाय दोन  

कॅप्ड भारतीय खिळाडू (१९)
अनकॅप्ड भारतीय खिळाडू (६३४)
अनकॅप्ड भारतीय खिळाडू ज्यांनी केवळ १ आयपीएल सामना खेळला आहे (६०)
कॅप्ड परदेशी खिळाडू (१९६)
एसोसिएट नेशन (२)

आयपीएल फ्रचायजीजकडे सोमवारी (९ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजेपर्यंत खेळाडूंना शॉर्टलिस्ट करु शकतात. यंदाच्या हंगामात परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियातील ५५, दक्षिण अफ्रिकेच्या ५४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. तर श्रीलंका ३९, वेस्टइंडीज २४,  न्यूझीलंड २२ आणि इंग्लंडच्या १९ खेळाडूंसह अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा समावेश आहे.  


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:IPL 2020 auction 971 players register for indian premier league kolkata auction including 215 capped internationals